पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात रस्ते विकासासाठी ६ कोटी मंजूर- आ आवताडे
मंगळवेढा/प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि मतदारसंघातील रस्ते सुविधा सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामांसाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या विभागाकडे आ. आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती. सन २०२४ – २५ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणाला आवताडे यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने या शासकीय विभागाकडे मागणी करून ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांसाठी ६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून आणला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.*मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी निधी मंजूर झालेले गावे :*ढवळस मारुती शेजाळवस्ती पासुन योगेश घोडके घरापर्यंत रस्ता, उचेठाण येथे उत्तरेश्वर पाटील शेत ते हरि सुळ शेत रस्ता, ब्रम्हपुरी राजेंद्र गुंड पुजारी वस्ती पासुन शामराव भोसले ते मुंढेवाडी रस्ता, माचणूर येथे समाधान डोके घर ते धर्मराज डोके घरापर्यंत रस्ता,तामदर्डी ते अरबळी रस्ता, खडीकरण करणे, बठाण शेंबडे ओढा ते पडकी शाळा रस्त्यावरुन बाळासो घोडके वस्ती ते दत्तात्रय घोडके वस्ती रस्ता,सिध्दापुर ते वडापुर जुना रस्ता,बोराळे पोलीस स्टेशन ते बारवमार्गे अंबाबाई मंदीरापर्यंत रस्ता,बोराळे जुना डोणज रस्ता, प्रकाश कवचाळे वस्ती ते कॅनॉल पर्यंत रस्ता,अरळी ते हरवाळवाडी रस्ता,नंदुर ते उंबरज रस्त्यावरुन चोरडे व भोजने वस्ती रस्ता, डोणज ते महासिध्द मंदीर ते जतकर गुरुजी वस्ती पर्यंत रस्ता,मुंढेवाडी लक्ष्मी मंदीर ते म्हसोबा देवस्थान रस्ता,रहाटेवाडी साळुंखे वस्ती ते चंद्रकांत पवार वस्ती रस्ता,रहाटेवाडी ते पालखी कट्टा रस्ता,पडोळकरवाडी आप्पा बावदाणे घरापासुन कोणीकोणूर हद्दीपर्यंत रस्ता, रहाटेवाडी सुनील पवार ते दिलीप पवार वस्ती रस्ता, , भोसे-रडडे रस्त्यावरुन पाटील, घाडगे वस्ती रस्ता,महादबाद हु, भिमा नरळेवस्ती ते नामदेव नागणेवस्ती रस्ता,लोणार- जाडर बोबलादर स्त्यावरुन मदने वस्ती ते कसरेड्डी वस्ती रस्ता,सलगर बु, दत्ता टिक्के वस्ती ते उमदी हद्दीपर्यंत रस्ता, लवंगी कदम वस्ती ते समिर जाधव वस्ती रस्ता,शिरनांदगी मच्छींद्र आसबे वस्ती ते गोपाळ कोळेकर वस्तीपर्यंत रस्ता,मारोळी मायाक्का मंदिरापासुन गडदे वस्ती पर्यंत शिरनांदगी हद्दीपर्यंत रस्ता,जंगलगी- चिक्कलगी रस्ता, ते कस्तुरे वस्ती रस्ता,चिक्कलगी संगाप्पा हत्ताळी वस्ती ते सिध्दण्णा हत्ताळी वस्तीपर्यंत रस्ता,शिरसी – नंदेश्वर शिव ते तानाजी गायकवाड वस्ती रस्ता,खुपसंगी-गोणेवाडी रोड ते सिध्देश्वर रुपनर घरापर्यंत रस्ता,आंधळगांव धरणवाडी ते मोरे लेंडवे वस्ती रस्ता, गोणेवाडी कांतीलाल मेटकरी वस्ती ते जयराम मासाळ वस्ती रानमळा रस्ता, गोणेवाडी नवनाथ मासाळ वस्ती ते निवास मासाळ, जगन्नाथ मासाळ वस्ती शिरसी हद्दीपर्यंत रस्ता, दामाजीनगर शाम चव्हाण बैठक हॉल ते डोके हॉस्पिटल रस्ता, जुनोनी डांगे वस्ती ते जाधव वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता, कचरेवाडी ते तुकाराम साठे शेता पर्यंत रस्ता, लेंडवे चिंचाळे मुरारवाडी ते फराटेवाडी रस्ता, डोंगरगांव चौगुले वस्ती ते पठाण वस्ती रस्ता, व मोरे पाटी ते कोकणवाट पर्यंत रस्ता, हाजापूर ते बिचुकले वस्ती ते खडकी रस्ता, देगांवजुना मारापुर रस्ता, ते अशोक माळी यांचे शेतापर्यंत रस्ता, व यादववाडी गावठाण ते गांडुळे वस्ती ते धनगर वस्तीपर्यत रस्ता, शेलेवाडी-आंधळगांव रस्ता, ते जगताप वस्ती रस्ता, धर्मगांव विष्णू भिंगे घरापासून गजानन आळगे घरापर्यंत रस्ता, मारापुर चंद्रकांत अनपट वस्ती ते धर्मराजआसबे वस्तीपर्यंत रस्ता, अकोला बबन इंगळे वस्ती ते तानाजी बुरांडे वस्तीपर्यंत रस्ता, गुंजेगांव महमदाबाद-आंधळगांव रस्त्यावरुन शेळकेवाडी ते माळी वस्ती रस्ता, घरनिकी खारावडा हरिदास लेंडवे घर ते भारत जाणकार घर व शरद मोरे वस्ती ते ज्ञानु आसबे वस्ती पर्यंत रस्ता, मल्लेवाडी सिध्देश्वर सलगर शेत ते मुरलीधर चौगुले शेत रस्ता, चोखामेळानगर मंगळवेढा – सांगोला रस्ता, रामचंद्र कोंडूभैरी शेत ते गाडवे वस्ती शाळेपर्यंत कॅनोल पट्टीवरून साईड पट्टी रस्ता, लक्ष्मी दहिवडी – आंधळगांव रस्त्यापासुन लिगाडे वस्तीपर्यंत रस्ता, जालीहाळ हजापूर सिद्धेनकेरी रस्त्यापासून टपरे, यजगर, पाटील वस्ती कडे जाणारा रस्ता, भाळवणी निंबोणी रस्त्यावरील लक्ष्मी चौकापासून जित्ती रस्त्यापासून जाणारा रस्ता, खोमनाळ ते पटवर्धन तलावाकडे जाणारा रस्ता, फटेवाडी सुधाकर फटे शेत ते स्मशान भूमीकडे जाणारा (कँनोल साईड पट्टी) | रस्ता, भालेवाडी ते दवले वस्तीकडे जाणारा रस्ता, तळसंगी मुंगसे वस्ती ते कोडग वस्तीपर्यंत रस्ता, बालाजीनगर आश्रमशाळा ते बनसोडे वस्ती, पाणीपुरवठा विहीर ते बनतांडा रस्त्यापर्यंत रस्ता, आसबेवाडी रामगोंडा, बिराजदार वस्ती ते शंकर ढाणे वस्तीपर्यंत रस्ता, येळगी ते सोड्डी फाटा खडीक्रशर पासुन शिवणगी हद्दीपर्यंत रस्ता, सलगर खु. ते शिवणगी रस्त्यापासुन माळी, बंडगर वस्तीकडे जाणारा रस्ता, सोड्डी ते कोकणगांव रस्ता, माळेवाडी हुलजंती ते जित्ती रस्त्यापासुन भोसले चौधरी वस्ती पर्यंत जाणारा रस्ता, बावची ते निंबोणी रस्ता, पौट-सलगर खु. रस्त्यापासुन निमगरे वस्तीपर्यंत रस्ता, जित्ती बाळुमामा मंदिर ते अशोक सावंत वस्ती रस्ता, येड्राव, कागष्ट रस्त्यापासुन डिकसळकडे जाणारा रस्ता, कागष्ट मंगळवेढा-चडचण रस्ता, ते अंकुश सावंत यांचे घराकडे जाणारा रस्ता, कात्राळ कारंडे वस्ती ते बनाप्पा खांडेकर वस्ती रस्ता, खडकी सोनार मळा ते लवटे वस्ती सिध्दनकेरी रस्ता, शिवणगी ते महालिंगराया मंदिरापर्यंत (बिजगुंती) रस्ता, मरवडे ते अमोल जाधव घर रस्ता, हुलजंती क्षिरसागर वस्ती ते संतोष अक्की शेत रस्ता, हिवरगांव गांवापासुन ते शिवाजी फटे घर ते जावीर वस्तीकडे जाणारा रस्ता, नंदेश्वर बाळू बंडगर वस्ती पासून गोनेवाडी रस्त्यापर्यंत रस्ता, भोसे – सांगोला रोड ते नवनाथ जोध वस्ती रस्ता, हुन्नुर – मंगळवेढा रस्त्यावरुन चौगुले वस्तीला जाणारा रस्ता,*पंढरपूर तालुक्यातील रस्त्यासाठी निधी मंजूर झालेले गावे :*गादेगाव प्रभाकर अंबादास फाटे ते संजय भारघव बागल वस्ती (कॅनोल खालील बाजू) रस्ता, गव्हाणमळा आरोग्य केंद्र ते महूद रसता व सुरेश गिड्डे घर ते उदा पाटील घर रस्ता, गोपाळपूर उमेश माने घर ते बनसोडे वस्ती रस्ता, गोपाळपूर पंढरपूर-मंगळवेढा रोड ते महादेव मंदिर रस्ता, गोपाळपूर श्रीकृष्ण नगर जगताप गुरुजी घर ते घोडके गुरुजी घर ते डॉ.पाटील घर रस्ता, शिरढोण पशुखाद्य कारखाना कडील जाणारा रस्ता, खर्डी दत्ता पाटील घर ते हेंबाडे घर रस्ता, खर्डी राम मंदिर ते घाडगे वस्ती ते शेबडे वस्ती रस्ता, खर्डी कासेगाव रोड १३ फाटा येवले पूल ते कैलास चंदनशिवे वस्ती पर्यत रस्ता, खर्डी खताळ वस्ती शेटफळ रोड ते पांडुरंग सुखदेव खताळ वस्ती रस्ता, एकलासपूर कासेगाव रोड ते अजित पैलवान वस्ती रस्ता, व एकलासपूर अनवली रोड ते सीताराम ताड (सर) वस्ती रस्ता, मुंढेवाडी बंडा श्रीपती शिंदे वस्ती ते सुदाम शंकर मोरे शेतपर्यंत रस्ता मुरमिकरण व पंढरपूर-गोपाळपूर रोड ते संजय मोरे (टेलर) वस्ती रस्ता, कासेगाव बळवंत देशमुख वस्ती ते तावशी शिव पर्यत रस्ता, कासेगाव तनाळी रोड ते विजय देशमुख वस्ती रस्ता, कासेगाव अंबिका नगर जाणारा रस्ता, कासेगाव-एकलासपूर रोड ते भुसे आबा मळा रस्ता, कासेगाव अर्जुन कळकुंबेवस्ती ते घोडके-भुसे वस्ती ते उजनी कॅनोल रस्ता, कासेगाव बाबासाहेब दत्तू जाधव सर घरासमोरील रस्ता, कासेगाव उजनी कॅनोल ते गावधंरे रस्ता, कासेगाव महादेव सुरवसे वस्ती ते नौशाद शेख वस्ती रस्ता, ल. टाकळी उदय ज्ञानदेव लवटे यांच्या घरासमोरील रस्ता, ल.टाकळी NRBC कॅनोल ते आबा कदम वस्ती रस्ता, ल.टाकळी NRBC कॅनोल ते देठे मळा ते नवनाथ देठे घर रस्ता, ल.टाकळी साई नगर ते जगताप घर रस्ता, ल.टाकळी उपअरोग्य केंद्र ते दत्त मंदिर रस्ता, सुधारणा करणे, तनाळी रोड ते शिराम वस्ती रस्ता, तावशी दादा क्षिरसागर वस्ती पासून ते गोरख बनसोडे वस्ती रस्ता, तावशी आशिष यादव शेत ते घरनिकी रस्ता, तावशी समाधान शंकर यादव घर ते क्षिरसागर वस्ती रस्ता, शिरगाव रावसाहेब घाडगे घर ते देवराव पाटील ते प्रवीण घाडगे घरापर्यंत रस्ता, अनवली अनवली-गुळ कारखाना रोड (मुन्ना साळुंखे जुनी वस्ती) ते सूर्यभान घोडके वस्ती रस्ता, शिरगाव बंदिश घाडगे घर ते पवार वस्ती रस्ता, रांझणी ते जुना अनवली रस्ता, रांझणी पंढरपूर-ओझेवाडी रोड ते सुरज गांडुळे वस्ती रस्ता, वाखरी चांद कोटे घर ते चव्हाण घर वस्ती (स्वामी विवेकानंद नगर) रस्ता, वाखरी-गादेगाव रोड ते माळी वस्ती (जि.प.प्रा.) रस्ता, कौठाळी ते धुमाळ पट्टा (वाखर रस्ता, उंबरगाव-पंढरपूर रोड ते विजय रामचंद्र चव्हाण रस्ता, बोहाळी-खर्डी रोड ते दिलीप जाधव शिव रस्ता, त. शेटफळ चौगुले वस्ती शिरी वाट रस्ता, कोर्टी स्मशान भूमी ते सत्यवान मस्के घर रस्ता, कोर्टी मारुती दादा वाघमारे वस्ती ते विठ्ठल शंकर वाघमारे वस्ती रस्ता अशी एकूण मतदारसंघात 6 कोटी रुपयाची रस्ते सुधारणेची कामे मंजूर झाली आहेत.
More Stories
मनसेच्या मागणीला यश मंगळवेढ्यात संतांच्या मंदिरांची माहिती असणारे बसविले दिशादर्शक फलक
परिचारकांना गट प्रबळ ठेवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढवावीच लागेल
गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा-आ समाधान आवताडे