पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे 39 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे तसेच पंढरपूर- मंगळवेढा व माढा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी नेहमीच सर्वांशी आपलेपणाने वागत असल्याने त्यांची क्रेज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच भावी आमदार म्हणून ही त्यांच्याकडे सध्या पाहिले जात असली तरी त्यांच्या नेतृत्वावर अनेक जण फिदा झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर- मंगळवेढा, माढा मतदारसंघात भव्य कुस्ती चे मैदान, भव्य रक्तदान, शिबिर पर्यावरण पूरक व वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी अशा विविध कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन केले आहे. आबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा झंजावत दौराही नियोजित करण्यात आला असून गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता श्री. संत नामदेव पायरी येथे कार्यकर्त्यांच्या समवेत महाआरती करण्यात येणार आहे, सकाळी साडेनऊ वाजता टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहणार आहेत, सकाळी साडेदहा वाजता अरण येथील श्री .संत सावतामाळी मंदिराचे दर्शन व त्या ठिकाणी उपस्थिती, सकाळी अकरा वाजता माढा येथील माढेश्वरी मंदिरदर्शन व उपस्थिती, दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन, दुपारी चार वाजता मंगळवेढा येथील श्री, संत दामाजीपंत मंदिर दर्शन, जय भवानी मंदिर, संत चोखामेळा समाधी, पीर साहेब दर्गा येथे दर्शन व उपस्थिती, त्यानंतर सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयात अभिजीत (आबा) पाटील प्रेमी कार्यकर्त्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा हार सत्कार स्वीकारले जातील वाढदिवसानिमित्त अभिजीत (आबा) पाटील मित्र परिवार उपयोगी कार्यक्रम घेतली असून प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहून जनतेचे प्रेम आणि आदर्श करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
More Stories
मनसेच्या मागणीला यश मंगळवेढ्यात संतांच्या मंदिरांची माहिती असणारे बसविले दिशादर्शक फलक
परिचारकांना गट प्रबळ ठेवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढवावीच लागेल
गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा-आ समाधान आवताडे