मनसेच्या मागणीला यश मंगळवेढ्यात संतांच्या मंदिरांची माहिती असणारे बसविले दिशादर्शक फलक
संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवेढा ही संत नगरी म्हणून ओळखली जाते संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,संत दामाजी पंत,संत गोपाबाई,स्वामी समर्थ, गैबिसाहेब,अशा अनेक संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राजवीर हजारे यांच्या प्रयत्नातून बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांना संतांच्या मंदिरांची माहिती व्हावी व त्या मंदिरापर्यंत सुलभपणे पोहचता यावे यासाठी मंगळवेढा नगरीत तीन ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्यात आले खरतरं महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर नगरीत प्रत्येक वारीला मोठ्या संख्येने वैष्णवभक्त येत असतात त्यातच पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या मंगळवेढा नगरीत देखील अनेक भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मनसेचे शहर अध्यक्ष राजवीर हजारे यांच्या मार्गदर्शनात लवण्यात आलेल्या दिशादर्शक फालकांमुळे येणाऱ्या भाविकांना संतांची मंदिरे माहित होण्यास मदत होणार आहे असे राजवीर हजारे यांनी सांगितले.
More Stories
परिचारकांना गट प्रबळ ठेवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढवावीच लागेल
गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा-आ समाधान आवताडे
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत ( आबा ) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा