परिचारकांना गट प्रबळ ठेवण्यासाठी ही निवडणूक लढवावीच लागेल
(प्रतिनिधी)
पंढरपूर हा स्वतंञ मतदार संघ असताना पंचवीस वर्ष स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली त्याच बरोबर त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत सहकार क्षेञातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता परंतु सन २००९ मधिल निवडणूकीत पंढरपूर हा स्वतंञ मतदार संघ न रहाता या २५२ मतदार संघास पुर्ण मंगळवेढा तालुका जोडला गेला तर पंढरपूर मतदार संघ हा माढा मोहोळ सांगोला या मतदार संघामध्ये विखुरला गेला २००९ च्या निवडणुकीत जिल्ह्य़ातील माळशिरस हा मतदार संघ आरक्षित झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पक्ष्याने त्यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे ठरवले व तो पक्ष आदेश मानत स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी निवडणूकीतुन माघार घेतली सदर निवडणुकीत मोहिते-पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर २०१४ मधिल निवडणुकीत प्रशांत परिचारक यांच्या पराभव झाला तर २०१९ च्या निवडणुकीत स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव झाला या निवडणुकी नंतर वर्ष भराच्या कालावधी नंतर तत्कालीन विद्यमान आमदार भारतनाना भालके यांचे दु:खद निधन झाले व काही महिन्यांनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी दोन पाऊल मागे घेत निवडणुक न लढवता समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला व आवताडे यांचा या पोटनिवडणुकीत विजय झाला परंतु जरी हे सर्व श्रुत असले तरीही गेल्या पंधरा वर्षांपासून जनतेतील आमदारकी पासून दूर असल्याने व दोन वेळा झालेला पराभव कुठेतरी आजही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसला असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांना दोन ते तीन पहिन्यांवर आलेली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुक पक्ष किंवा अपक्षतरी गट प्रबळ ठेवण्यासाठी लढवणे गरजेचे बनले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातुन होताना दिसुन येत आहे.
More Stories
मनसेच्या मागणीला यश मंगळवेढ्यात संतांच्या मंदिरांची माहिती असणारे बसविले दिशादर्शक फलक
गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा-आ समाधान आवताडे
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत ( आबा ) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा