December 16, 2024

भव्य संत सृष्टीसाठी मंगळवेढ्याचे शिष्ट मंडळ मनसेचे श्री दिलीप धोत्रे यांच्या भेटीला

मंगळवेढा प्रतिनिधी:

आपला मंगळवेढा ही एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते हे आपणा सर्वांना तर माहीतच आहे परंतु आज पर्यंत कोणीही असा प्रस्ताव मांडलेला नाही जो मंगळवेढ्याच्या सर्व संतांच्या माहितीचा असेल व आपल्या भविष्यातील पुढच्या पिढीला एक नवीन दिशा देणारा हा प्रकल्प असेल जो प्रकल्प म्हणजे भव्य अशी संतसृष्टी म्हणजेच आपल्या शहरातील होऊन गेलेले संत महंत यांची माहिती देणारा असेल तसेच मंगळवेढ्यात एक नवीन संत सृष्टी व्हावी ही जर संत सृष्टी उभा राहिली तर मंगळवेढ्यात एक नवचैतन्याचे वातावरण निर्माण होईल यात काही शंका नाही यासाठीच मंगळवेढ्याचे संत सृष्टीचे शिष्टमंडळ व मनसेचे पदाधिकारी श्री मनसेचे नेते माननीय श्री दिलीप धोत्रे यांच्या भेटीला गेले असता त्यांच्याकडून आपण ही संतसृष्टी शंभर टक्के उभा करू यात कोणतीही शंका नाही यासाठी मी स्वतः राज साहेबांशी बोलून यावर आपण काम करू असं आश्वासन माननीय श्री मनसेचे दिलीप धोत्रे यांनी शिष्टमंडळाला दिले व लवकरच मंगळवेढ्याचे शिष्ट मंडळ व मनसेचे पदाधिकारी राज साहेब ठाकरे यांच्या भेटीला मुंबईला जाणार असून या संतसृष्टीसाठी आपण सर्वांनी व मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांनी याकरिता मनसेच्या व संत सृष्टीच्या शिष्टमंडळाच्या पाठीमागे ठामपणे उभा रहावं असं वक्तव्य माननीय श्री मनसेचे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांनी केला आहे आपणा सर्वांच्या या पत्रकार यांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून हा प्रोजेक्ट तडीस न्यायचा आहे हे लक्षात राहू द्या असं राजवीर हजारे म्हणाले. त्यावेळी उपस्थित नगरसेवक राहुल (आप्पा) सावंजी, राजवीर हजारे,सुरज हजारे, कृष्णा ओमणे, मारुती वाघमारे ,रवी कोरे, तेजस शिंदे, प्रवीण कोंडूभैरी, विकास शिरसागर ,अनिल बागल, शशिकांत पाटील, दीपक भोसले आदी उपस्थित होते.